संजय गांधी नगर, गरिबी हटाव नं. २, उदयविकास मराठी शाळेजवळ, बिजापूर रोड, सोलापूर

०१. प्रवेश प्रक्रिया आणि काही महत्त्वाच्या नियमांविषयी सविस्तर -

  • मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसनाधीन व्यक्ती जर सरकारी नोकर असेल तर २९ दिवसांचे व इतरांसाठी ३३ दिवसांचे वास्तव्य अपेक्षित आहे.
  • जर दाखल केलेल्या रुग्णाला इतर आजारावर बाहेरील हॉस्पिटल मधील काही वैद्यकीय सेवा लागल्यास त्याचा खर्च स्वतंत्ररित्या करावा लागेल.
  • रुग्ण अल्कोहोल विथड्रॉल स्थितीमध्ये असल्यास रुग्ण या स्थितीमधून बाहेर पडेपर्यंत गरज पडल्यास नातेवाईकांना बोलवल्यास वेळेवर येणे बंधनकारक राहील.
  • प्रवेश घेतेवेळी रुग्णाचे आधार कार्ड देणे बंधनकारक राहील.

०२. दाखल करताना रुग्णासोबत द्यावयाचे सामान -

  • दोन पांढरे शर्ट / टी-शर्ट
  • दोन पायजमे, अंडरवेअर्स, बनियन्स, टॉवेल
  • अंगाचा व कपड्यांचा साबण, कंगवा, टूथपेस्ट, टूथब्रश

०३. नातेवाईकांसाठी महत्त्वाच्या सूचना -

  • रुग्णमित्रास भेटण्यासाठी नातेवाईकांनी पुढील वेळेत यावे.
  • मंगळवार - सकाळी दहा ते चार पर्यंत.
  • एका वेळी फक्त दोनच नातेवाईक रुग्णमित्रास भेटू शकतात.
  • आमची संस्था संपूर्णपणे व्यसनमुक्तीसाठी काम करत असल्यामुळे नातेवाईक व्यसन करून आल्यास (तोंडात तंबाखू असल्यास, दारु पिऊन आल्यास) त्यांना आत प्रवेश मिळणार नाही. आपल्या जवळ तंबाखूजन्य पदार्थ असल्यास ते बाहेरील बॉक्समध्ये टाकावेत व त्यानंतरच नातेवाईकांना आज प्रवेश देण्यात येईल.
  • आपला रुग्णमित्र मानसिक त्रासात असल्यामुळे कदाचित तो अस्वछ राहू शकतो तसेच संस्थेच्या आतील परिसर अस्वच्छ करू शकतो. तरी आपण नातेवाईकांनी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा.
  • रविवार हा संस्थेच्या आठवडे आठवड्याच्या सुटीचा दिवस असल्यामुळे रविवारी रुग्ण मित्राला डिस्चार्ज देण्यात येणार नाही तसेच इतर दिवशी संध्याकाळी पाच नंतर रुग्णमित्र डिस्चार्ज करण्यात येणार नाही.
  • आपल्या रुग्ण मित्राचे व्यसन सोडविण्यासाठी कुटुंबीयांचा शंभर टक्के सहभाग सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णमित्र दाखल झाल्यावर रुग्णाला सोबत राहता येणार नाही. त्यानंतरच्या दिवसांमध्ये दर दिवशी किमान एकदा तरी नातेवाइकांनी समुपदेशकाशी संवाद साधण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राच्या नंबर वर फोन करणे गरजेचे राहील.