संजय गांधी नगर, गरिबी हटाव नं. २, उदयविकास मराठी शाळेजवळ, बिजापूर रोड, सोलापूर

सेवा व सुविधा

आम्ही पुरवतो सर्वोत्तम
सेवा व सुविधा

२४/७ रुग्णसेवा

मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र, सोलापूर हे २४/७ रुग्णांना सेवा देण्यास तत्पर आहे. रुग्णसेवा हीच खरी सेवा हा ध्यास मनी असल्यामुळे, एकही दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद नसते.

व्यायाम

शारीरिक स्वास्थासाठी नियमित व्यायाम करणे हे खुप आवश्यक असते. त्यामुळे मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दररोज रुग्णांकडुन सकाळी नियमित व्यायाम सराव करून घेतला जातो.

योगा

व्यसन सोडवण्यासाठी मानसिक स्वास्थ हे खूप आवश्यक असते. त्यामुळे मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दररोज सकाळी तज्ञ व्यक्तीकडुन योग, प्राणायाम यांचा सराव करून घेतला जातो.

समुपदेशन

व्यसनी लोकांना व्यसनाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठीचा पहिला उपाय म्हणजे समुपदेशन. समुपदेशन (काउंसेल्लिंग) म्हणजेच रुग्णाला बऱ्या, वाईट तसेच चूक व बरोबर या गोष्टीमधला फरक दाखवुन दिला जातो.

वैयक्तिक लक्ष

मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये प्रत्येक रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. तसेच, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर त्यांना योग्य ते समुपदेशन करून त्यांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

औषधोपचार

समुपदेशना सोबतच व्यसनी रुग्णांना व्यसन सोडण्यासाठी ठराविक औषधांची गरज असते. मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रुग्णांवर योग्य ते औषधोपचार केले जातात.

घरगुती भेट

मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रामधून बरे झालेल्या रुग्णांच्या घरी दर पंधरा दिवसांनी केंद्रातील कर्मचारी भेट देतात. या भेटीमध्ये त्यांच्याशी तसेच त्यांच्या घरच्यांशी चर्चा करून त्यांचा फॉलोअप घेतला जातो.

वैद्दकिय तपासणी

मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ज्या रुग्णांनी प्रवेश घेतला आहे, त्या रुग्णांची नियमितपणे वैद्दकिय तपासणी केली जाते. या तपासणीचा रिपोर्टवरूनच तज्ञ डॉक्टरांकडून वैद्दकिय मार्गदर्शन केले जाते.