संजय गांधी नगर, गरिबी हटाव नं. २, उदयविकास मराठी शाळेजवळ, बिजापूर रोड, सोलापूर

प्रश्नावली

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र हे व्यसनाधीन लोकांना व्यसनाच्या जाळ्यातून बाहेर काढते पण त्यासोबत त्यांना मानसिकरीत्या स्थिर करते.

येथे आपल्याला प्रत्येक रुग्ण हा स्वतःला स्वतंत्र व सुरक्षित समजतो.

मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये कुठले कुठले व्यसन सोडले जाते?

मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दारू, गांजा आणि ताडी याचे व्यसन लागलेल्या व्यसनाधीन लोकांवर उपचार केले जातात.

मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार कसे केले जाते?

मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये व्यसनाधीन लोकांशी चर्चा करून, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातात. नंतर त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या अडचणींवर मार्ग काढला जातो. तसेच, व्यसनावर त्यांना समुपदेशन केले जाते. तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले जातात.

केंद्राचा फॉलोअप प्रोग्राम म्हणजे काय?

३३ दिवसांसाठी केंद्रामध्ये व्यसनाधीन लोकांना प्रवेश दिला जातो. त्यानंतर उपचार झाल्यानंतर रुग्ण जेव्हा घरी जातो, तेंव्हा दर पंधरा दिवसांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी व त्यांच्या घरच्यांशी संवाद साधून त्यांचा फॉलोअप घेतला जातो.

व्यसन म्हणजे काय?

व्यसन म्हणजे एखादी अशी सवय कि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शारिरीक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असुनही त्यात बदल करणे शक्य होत नाही.

व्यसनमुक्ती केंद्रात वास्तव्य का आवश्यक आहे?

बहुतांशी वेळेला व्यसनमुक्ती केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे फक्त व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्त करायची जागा एवढाच असतो. पण मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र त्याही पलीकडे जाऊन व्यसनी व्यक्तीला व्यसनी पदार्थांपासून दूर ठेवण्याबरोबरच, त्याला स्वतःच्या चांगल्या व योग्य गुणांची ओळख करून द्यायचा प्रयत्न करते. समाजात त्याचे स्थान पुन्हा सबख करून देण्यास मदत करते. मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र, व्यसनी व्यक्तीचे उध्वस्त कुटुंब पुन्हा सावरण्यास पूर्णतः मदत करते. आमची लढाई व्यसनी व्यक्तीशी नाही तर व्यसनाशी आहे, असे मानून व्यसनी व्यक्तीच्या पूर्ण कुटुंबात कोणत्याही प्रसंगात समर्थपणे सामोरे जाण्यास मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र मार्गदर्शन करते.